Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

उपस्थिती ध्वज

हा उपक्रम घेताना दररोज परिपाठ झाल्यावर सर्व मुलांची हजेरी त्या त्या वर्गाच्या मोनिटरनी घ्यावी. ज्या वर्गाचे विदार्थ्यी १००% हजर असतील त्या मुलांना उपस्थिती ध्वज द्यावा. त्या वर्गातल्या मुलांनी सर्व प्रथम वर्गात जावे त्या वेळेला बाकीच्या मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवाव्यात. तो पूर्ण दिवस उपस्थिती ध्वज त्या वर्गासमोर असेल. जर परिपाठाला कोणताही वर्ग १०० % हजर नसेल तर टक्केवारी कडून जास्त टक्के हजर असणाऱ्या वर्गाला तो उपस्थिती ध्वज द्यावा. आणि जर एकपेक्षा जास्त वर्गातील मुले १०० % हजर असतील तर विधार्थ्यांचा पोशाख, toy, बेल्ट अश्या गोष्टी पाहून त्या वर्गाला उपस्थिती ध्वज द्यावा.
वर्षाच्या शेवटी ज्या वर्गाला जास्त वेळा उपस्थिती ध्वज मिळाला असेल त्या वर्गाच्या वर्गशिक्षकाचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा.