Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

कागदाच्या लगद्यापासून मुखवटा

साहित्य – रद्दी पेपर, खळ, रंग, फुगा, प्लास्टिक बाटली
कृती – कागदाचा लगदा करण्यासाठी रद्दी पेपर चे तुकडे करून घ्यावेत .
ते पाण्यात भिजू द्यावेत. काही वेळाने ते पिळून वाटून घ्यावेत.
त्यात खळ मिसळावी व एकजीव करावे.
नंतर मुखवटा तयार करण्यासाठी मोठा फुगा फुगवून त्याचे तोंड घट्ट बांधावे.
त्यावर कागदाचे तुकडे खालीच्या साह्याने चिटकवावे असे ५-६ थर द्यावेत.
त्यावर आपणाला पाहिजे त्या आकाराचा मानवी चेहरा तयार करून घ्यावा.
वाळल्यानंतर फिनिशिंग करून रंग द्यावा. फुग्याचा आर्धा भाग कापून घ्यावा.
हा तयार होईल आपला मुखवटा .
अश्याप्रकारे आपण टाकाऊ वस्तूपासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती तयार करू शकतो.


20150413005431