Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

ऎच्छिक उपक्रम

ऎच्छिक उपक्रमात
०१.) उत्पादन क्षेत्रे
०२.) तंत्रज्ञान क्षेत्रे
०३.) इतर क्षेत्रे
या क्षेत्राचा समावेश होतो.

०१.) उत्पादन क्षेत्रे —- उत्पादन क्षेत्रात अन्न , वस्त्र , निवारा यांचा समावेश होतो. यात लिंबाचे लोणचे करणे , फळांवर प्रक्रिया करणे , बागकाम करणे , वस्त्र निर्मिती करणे , मातीकाम करणे , बांबूकाम करणे , मत्स व्यवसाय करणे अश्या प्रकारचे उपक्रम घेऊ शकतो.

०२.) तंत्रज्ञान क्षेत्रे — तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान वापरात येणारे उपक्रम निवडावेत. यात संगणकावर आधारित जास्तीत जास्त उपक्रम निवडावेत. संगणकावर पेंटिंग करणे , नोट पॅड , वर्ड पॅड वापरणे , फाइल्स सेव करणे, power point वापरणे , टायपिंग करणे , वेगवेगळ्या सोफ्टवेरची माहिती , हार्डवेरची माहिती , संगणकाचे पार्ट अश्या प्रकारे भरपूर उपक्रम आपणाला यात घेता येतील.

०३.) इतर क्षेत्रे — इतर क्षेत्रात शेती विषयक उपक्रम घ्यावे. वेगवेगळ्या जनावरांच्या जाती , प्राण्यांचे उपयोग , प्रांण्यांचे वर्गीकरण दुध देणारे प्राणी अश्या प्रकारे भरपूर उपक्रम आपणाला यात घेता येतील.