Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

केरसुणी तयार करणे

सर्व प्रथम सिंधी च्या झाडाचे फाटे कापून आणावे. त्यांना २-३ दिवस उन्हात चांगले वाळवावे.
20150421061012


फाटे चांगले वाळल्यानंतर त्या फाट्याना उभे धरून काठीने चांगले झोडपावे जेणेकरून त्याचे पाने मोकळी होतील.

20150421061012 (2)

त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे फाटे सोलून त्यांचे लहान लहान फांद्या बाजूला काढाव्यात.

20150421061012 (1)

नंतर त्या फांद्या गोळा करून चित्रात दाrखवल्याप्रमाणे एकत्र घट्ट बांधाव्या.

20150424004825

नंतर त्याची खालील बाजू पाहिजे तेवढी दुमडून घ्यावी .
त्यावर दोरी गच्च बांधावी. आणि समोरून त्याचे तीन समान भाग करून त्यांना वेगवेगळे गच्च बांधावे.
चित्र पहा

20150424004743

अश्याप्रकारे आपली केरसुणी बांधून झाल्यानंतर त्याची पाने वेगवेगळी करण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे अणुकुचीदार खिल्यांवर हळू हळू मारावे आणि फुललेली केरसुणी तयार होईल.

20150424005108