Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

माझी बँक


विद्यार्थ्यांना पालक खाऊसाठी काही पैसे देत असतात किंवा काही भागात विद्यार्थी शाळा सुटल्यावर काही कामे करतात. उदा. कापूस वेचणी ,बोर वेचणी,इ. तसेच कोणी पाहुणे मंडळी आल्यास तेही मुलांना थोडेसे पैसे देतात.
असे पैसे आपण जर विद्यार्थ्यांची बँक बनवून त्यात ठेवले तर मुलांना योग्य वेळी ते पैसे करता येतील. शालेय साहित्य खरेदी करता येईल. त्यासठी स्वतंत्र रजिष्टर करून त्यात मुलांची खाती काढता येतील. शक्य झाल्यास त्यांना पासबुक ची पण व्यवस्था करता येईल. व्यक्तिपरत्वे या उपक्रमात बदल करता येईल. व मुलांना बचतीची सवय तसेच बँकेचे कामकाज समजावून देता येईल.