Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

दप्तरा विना शाळा

या उपक्रमात आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके जमा करावी.
जमा केलेल्या जुन्या फाटक्या पुस्तकांना गोंद लावून, कव्हर लावून त्यांचे गठ्ठे बांधून ठेवावे.
आता पुढील सत्रात शिक्षकांनी वर्गनिहाय विद्यार्थ्याना दोन संच वाटप वाटप करावीत.
एक जुना व दुसरा नविन नविन पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांना चांगल्या स्थितीत ठेवण्याबाबत आग्रह करुन पालकासमक्ष घरी ठेवण्यास, घरी अभ्यास करण्यास देण्यात यावा, त्यावर नियंत्रण पालक ठेवतील.
जुन्या पुस्तकांचा संच वर्गात वापरण्यास देण्यात यावा त्यावर नियंत्रण वर्ग शिक्षकांनी ठेवावे पुढील सत्राच्या शेवटी विद्यार्थी घरी असलेला पुस्तकांचा संच शाळेत जमा करतील.
अशाप्रकारे कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला दप्तराविना शाळेत येता येईल.
दप्तराचे पाठीवरील ओझे कमी झाल्याने बालवयात पाठीच्या कण्यावर ताण पडणार नाही.
विद्यार्थ्याचा मानसिक त्रास कमी होईल शाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा ही भावना वाढीस लागेल पुस्तक जपून ठेवण्याची सवय लागेल.