Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

जल साक्षरता

पाणी हा घटक गरजाधिस्टित उपक्रम या अंतर्गत अनिवार्य उपक्रमात घेतला जातो.
पाणी म्हणजे जीवन आहे असे म्हटले जाते. कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपण पाणी पीत असल्याने ते शुद्ध असणे गरजेचे असते. कारण बहुंतांश रोग हे अशुद्ध पाणी पिल्याने होतात. आपण जसे अन्नधान्य पाकडून, निवडून घेतो तसे पाण्यासाठी काही करत नाही. पण त्याचे फार वाइट परिणाम आपणाला दिसून येतात. त्यासाठी आपण पाणीही निर्जंतुक करून वापरावे.पाण्यात क्लोरीन टाकून किंवा ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निर्जंतुक करून वापरावे.
ज्या ठिकाणी माणसांची वस्ती असते त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात विहारी , हातपंप , कुपनलिका असतात. शहराच्या ठिकाणी तर घरोघरी कुपनलिका असतात. बऱ्याच वेळेस उन्हाळ्याच्या वेळेस असे स्त्रोत कोरडे ठाक पडतात. याचाच अर्थ जमिनीतील पाणी फार कमी होत चालले आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे आपण लहान असताना म्हणजे २०-३० वर्षापूर्वी जी पाण्याची परिस्थिती होती ती आता नाही. पाण्याचे प्रमाण वरचेवर कमी होत चालेले आहे आणि पाण्याची गरज फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भावी काळासाठी आपण पाणी साठवणे गरजेचे आहे.आपणाला पावसाळ्यात पाणी कृत्रिम रित्या झिरपण्याचे प्रमाण वाढवावे लागेल.मोठ्या प्रमाणात पाणी काढूनही पाण्याची पातळी घसरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपणाला काही उपाय किंवा आपल्या स्तरावर जे शक्य होतील ते उपक्रम घ्यायचे आहेत. काही उपाय मी आपल्यासमोर मांडत आहे त्यापैकी जे जमतील ते आपण घ्यावेत.

entry_contest_thumbnailimagesnews_8_5_2010_16
——————————————————————————————————————-

०१.) वनराई बंधारा बांधणे = आपल्यापैकी बरेच जण हा उपक्रम आपापल्या शाळेत राबवत असतील. या उपक्रमात आपण ओढा किंवा लहान नदी यांचे पाणी आपण आडवावे. त्यासाठी पोत्यात वाळू किंवा माती भरून काही ठिकाणी दगडांचा वापर करून आपण बांध घालू शकतो व पाणी जमिनीत झिरपण्यास मदत करू शकतो.पण बांध घालताना पाण्याची खोली आणि प्रवाहाची तीव्रता पाहून आपण जागा निवडावी.
ppl
——————————————————————————————————————-

०२.) डोंगर उतारावर बांध घालणे = आपणाला माहित आहे डोंगरावर पडलेले पाणी सरळ खाली वाहत जाते त्यामुळे त्याचे जमिनीत झिरपण्याचे प्रमाण कमी असते . अश्या वेळेस आणि जवळपास डोंगर असेल तर त्या ठिकाणी जागोजागी बांध घालून डोंगरावर पडणारे पाणी आपण आडवू शकतो. किंवा समांतर रेषेत खड्डे पडून पाणी साठण्यास मदत करू शकतो.
bhandara-dongar-dehu-3images
——————————————————————————————————————-

०३.) पावसाच्या पाण्याचा वापर = बऱ्याच वेळेस पावसाचे पाणी पडून वाहून जाते.आपल्या घराच्या / शाळेच्या छतावरही भरपूर पाणी पडत असते. ते तसेच वाहून जाते.अश्या पाण्याचा वापर आपण स्वछतेसाठी किंवा इतर कामासाठी करू शकतो . त्यासाठी आपण छतावर पडणारे पाणी एका ठिकाणी जमा करावे लागेल खालील चित्रावरून आपणास लक्षात येईल.
1160969-234459-Rainwater-harvesting-system3
——————————————————————————————————————

०४.) पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण = पावसाच्या पाण्याचा वापर नको वाटत असेल तर आपण ते पाणी परत जमिनीत झिरपण्यास मदत करू शकतो. पाणी आपण फ़क़्त जमिनीत खड्डा करून त्यात सोडावे आणि परत तेच पाणी झिरपून आपल्यालाच उपयोगी पडेल. खालील चित्रावरून आपल्या लक्षात येईल.
pani 12rwh_img1
——————————————————————————————————————-

०५.) पाण्याचा प्रवाह यौग्य दिशेला वळवणे – ज्या ठिकाणचे पाणी आपणाला जमिनीत झिरपावने शक्य नसेल अश्या ठिकाणी आपण त्या पाण्याचा प्रवाह यौग्य दिशेला वळवावा जेणेकरून पाणी मोठ्या साठवण तलावात जाईल. आणि वाया जाणार नाही.
images (1)water turn valley bridges ireland travel rivers reflections creek 1920x1200 wallpaper_wallpaperswa.com_72
——————————————————————————————————————-

०६.) पाणी वाचवणे – पाणी यौग्य वापरणे किंवा वाचवणे म्हणजे पाणी तयार करण्यासारखे आहे. आपण व आपले विद्यार्थी दररोज खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करू शकतो. उदा. झाडांना पाणी घालताना पाटाने पाणी घालन्यापेक्षा झारीने घालावे , पिण्यासाठी पाहिजे तेवढेच पाणी घेणे , पिण्याच्या बाटलीतील पाणी शिल्लक राहिल्यास ते पाणी झाडांना घालणे , नळ तसाच सुरु ठेवण्यापेक्षा तो बंद करणे , दररोज पाणी आपण भरपूर कारणासाठी वापरात असतो त्याचा कमीत कमी वापर करावा. अश्याप्रकारे अनेक उपक्रम आपण पाणी वाचवण्यासाठी घेऊ शकतो.
save-waterdownload20150410004509
——————————————————————————————————————-

०७.)आधुनिक पद्धतीने शेती = पाण्याच्या कमीत कमी वापरावर जास्तीत जास्त उत्पादन आधुनिक पद्धतीने शेती केल्यास येऊ शकते.आपण आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीस भेटी देऊ शकतो. पूर्वीच्या पाणी देण्याच्या पद्धत्ती आणि आधुनिक पाणी देण्याच्या पद्धती यातील फरक विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो . ठिबक सिंचन , तुषार सिंचन , मल्चिंग पेपरवर शेती अश्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास पाण्याची बचत होते हे आपण विद्यार्थ्यांना पटऊन देऊ शकतो. विशेष म्हणजे अश्या गोष्टीसाठी आपणाला शासन अनुदान देते.
20150410004513 (6)20150410004513 (2)
——————————————————————————————————————-