Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

गृहपाठ तपासणी पथक

आपण विद्यार्थ्यांना नेहमी गृहपाठ देत असतो. दुसऱ्या दिवशी सर्वांचा गृहपाठ तपासणे शाळा मोठी असल्यास अवघड जाते. आणि जर आपण दररोज गृहपाठ नाही तपासला तर काही विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करणार नाहीत.
त्यासाठी आपण आपला वेळ वाचवा आणि गृहपाठ ही तपासला जावा यासाठी वर्गातील काही हुशार मुलांची गृहपाठ तपासणी पथकावर नेमणूक करू शकतो. हे पथक शाळा भरण्यापूर्वी गृहपाठ तपासण्याचे काम पूर्ण करू शकतात.
यामुळे आपला वेळ वाचतो आणि गृहपाठ तपासण्याचे कामही पूर्ण होते.