Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

गांढूळ खत प्रकल्प

शेतीसाठी खतांचे खूप महत्त्व आहे.
पण वारंवार रासायनिक खते वापरल्याने जमिनी नापीक होतात हेही आपणाला माहित आहे .
तसेच आपल्या शाळेत कचरा ही खूप होत असतो त्याची यौग्य पद्धत्तीने विल्हेवाट लावणे गरजेचे असते.
त्यासाठी एक चांगला प्रकल्प म्हणून आपण गांधूळ खत निर्मिती करू शकतो.
त्यासाठी आपण सर्वप्रथम एक खड्डा खोदावा. शक्यतो खड्डा सावलीला असावा.
कारण त्या ठिकाणी आपणाला नेहमी ओलसरपणा ठेवावा लागतो.
त्या खड्ड्यात आपण पालापाचोळा टाकावा.
नंतर त्यावर माती टाकावी.
त्या मातीत शक्य झाल्यास शेण टाकावे.
नंतर त्याला चांगले पाणी मारून त्यात गांधुल सोडावेत.
आणि वरूनही पालापाचोळा टाकावा .
जेणेकरून सर्व माती झाकून जाईल .
त्याला नेहमी पाणी द्यावे ओल टिकवून ठेवावी.
जवळपास १ महिण्यानंतर आपले खत तयार होईल.
ते खत तसेच शेतात टाकावे.
म्हणजे त्यातील गांधुल शेतजमीनही भुसभुशीत करतील.