Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

अनिवार्य उपक्रम

अनिवार्य उपक्रमाची सर्व शाळांनी आमलबजावणी करणे आवश्यक असते.
अनिवार्य उपक्रमात
०१.) गरजाधिस्टित उपक्रम
०२.) अभीरुचीपूर्वक उपक्रम
०३.) कौशल्याधिस्टित उपक्रम
अश्या तीन प्रकारांचा समावेश होतो.

०१.) गरजाधिस्टित उपक्रम —— या उपक्रमाअंतर्गत आपण रांगोळी काढणे , वर्ग सजवणे , नेहमी फळ्यावर दिनांक वार सुविचार लिहणे अश्या प्रकारचे उपक्रम घेऊ शकतो. यात जलसाक्षरता अंतर्गंत पाण्यासंबंधी म्हणी , पाण्याचा यौग्य वापर , पाणी आडवणे , पाणी जिरवणे , पाण्याचे महत्त्व तसेच आपत्ती व्यवस्थापण याअंतर्गत वादळ , महापूर, दुष्काळ अश्या आपत्ती आल्यास काय उपाय करावे याचेही उपक्रम आपण घेऊ शकतो.

०२.) अभीरुचीपूर्वक उपक्रम —– या उपक्रमाअंतर्गत आपण विध्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रम घ्यावेत. मातीपासून बनवायच्या वस्तू , बैल , गणपती , कागदापासून बनवायच्या वस्तू तसेच वर्ग सुशोभीकरण्याच्या वस्तू तक्ते इ.

०३.) कौशल्याधिस्टित उपक्रम —— या उपक्रमाअंतर्गत आपण विध्यार्थ्यांच्या कौशल्यावर आधारित उपक्रम घेऊ शकतो . तक्ते तयार करणे , टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, राख्या तयार करणे अश्याप्रकारे आपण विध्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने उपक्रम घेऊ शकतो.