Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

आपत्ती व्यवस्थापन

बऱ्याच वेळा आपण नैसर्गिक आपत्ती बद्दल ऐकतो. त्यामुळे अनेक माणसे , प्राणी मरतात , घरे पडतात. उदा. महापूर , वादळ , दुष्काळ , भूकंप अशी नैसर्गिक संकटे आल्यास आपण घाबरून न जाता त्याला कसे तोंड द्यावे याची माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यावी. कारण या आपत्ती आपल्या हातात नसतात किंवा त्यांना थांबवणे ही आपल्या हातात नसते. त्यामुळे या सर्व नैसर्गिक संकटांची माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यावी.
०१.) महापूर = ज्या गावांच्या शेजारी नदी , तलाव असतो त्या गावांना पुराचा धोका असतो. सतत २-4 दिवस पाऊस पडला तर पुराचा धोका वाढतो. त्या वेळेस नदीचे पाणी नदीचे पात्र भरून बाजूनेही वाहत असते. कधी कधी ते पाणी गावातही शिरते. घरे , झाडे सर्व कोलमडून पडते. प्राणी , माणसे , वाहने पाण्यासोबत वाहून जातात. अश्या वेळेस आपण पाण्यात जाऊ नये कारण पाण्याचा प्रवाह जास्त असतो. आपण जास्तीत जास्त उंचावरील जागा शोधावी व तिथे बसावे म्हणजे पाणी आपल्यापर्यंत पोचणार नाही. पुरापासून जास्तीत जास्त लांब जाण्याचा प्रयत्न करावा . सगळ्यात उत्तम म्हणजे पूर यायचा अंदाज असेल तर आधीच सुरक्षित ठिकाण शोधावे. अश्याप्रकारची सखोल माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यावी.

367238_img650x420_img650x420_crop 0,,17185608_303,00images (1)
——————————————————————————————————————-
०२.) वादळ = सोसाट्याचा वारा सुटणे म्हणजे वादळ होय. या वाऱ्याचा वेग फार जास्त असतो. त्यामुळे घरावरचे पत्रे उडून जातात. तसेच हवेत सगळीकडे धूळ आणि पालापाचोळा असतो. झाडे कोलमडून पडतात आणि अश्या वातावरणात वाहने चालवणे म्हणजे फार धोक्याचे असते. त्यामुळे अश्या वेळेस आपले घर सोडू नये तेही पक्के असावे. आणि आपण जर बाहेर असू तर चांगल्या मजबूत , पक्क्या निवाऱ्याचा आसरा घ्यावा. अश्याप्रकारची सर्व माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यावी.

hailsg250611e images (2)Broken-tree_1350505596544_292610_ver1.0_320_240
——————————————————————————————————————-
०३.) भूकंप = जमीन हादरणे म्हणजे भूकंप होणे. जमिनीच्या पोटात काही हालचाली होतात त्यामुळे भूकंप होतो. भूकंपाने घरे हादरतात , त्यातील वस्तू पडतात , मातीची साधी घरे तर भूइसपाट होतात. त्यात आडकून माणसे मरतात. कधी कधी भूकंपाची तीव्रता जास्त असल्यास जमिनीला भेगा पण पडतात. १९९३ ला आम्ही लहान असताना लातूर , किल्लारी येथे भूकंप झाला होता. त्या रात्री घरघर असा आवाज होत होता , सगळ्या वस्तू खाली पडत होत्या आई ने आम्हाला उठवले व आम्ही सगळे घराबाहेर पळालो.त्या वेळेस किल्लारी हे गाव बेचिराख झाले होते. असो भूकंप झाल्यास आपण सर्वप्रथम घराबाहेर पडावे , तसे शक्य नसल्यास चौकटीत किंवा खिडकीत उभे राहावे. तेही शक्य झाले नाही तर पलंगाखाली किंवा टेबलाखाली बसावे पण तो मजबूत असावा. अश्या सर्व गोष्टी मुलांना समजून द्याव्यात.

download earthquake-in-latur-1_092912015613images
——————————————————————————————————————-
०४.) वीज पडणे = आवकाळी पावसात नेहमी ढगांचा गडगडाट असतो व त्या काळात विजा मोठ्या प्रमाणात पडतात.आपण नेहमी वाचतो वीज पडल्यामुळे काय काय नुकसान होते ते अश्या संकटाना आपण रोखू शकत नाही पण त्यापासून आपला बचाव मात्र करू शकतो. दोन ढग एकमेंकांवर घासले की वीज तयार होत असते.बऱ्याच वेळा वीज हवेतच विरून जाते मात्र जर तिचा प्रभाव जास्त असेल तर ती जमिनीवर पडते. वीज नेहमी झाडांवर पडते कारण झाडे उंच असतात व वीज जमिनीवर पडताना नेहमी जी वस्तू जवळ असते त्याकडे आकर्षित होते. त्यामुळे विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईल ची रेंज हवेतून येत असल्याने विजा कडकडत असताना मोबाईलकडे वीज आकर्षित होऊ शकते. म्हणून अश्या वातावरणात मोबाईल बंद ठेवावा . शहरात बऱ्याच ठिकाणी मोठ- मोठ्या बिल्डींग वर विजविरोधक तांब्याची पट्टी बसवलेली असते. ही पट्टी विजेची ताकत कमी करते व वीज हवेतच विरून जाते आणि जर जास्त ताकतीची असेल तर पट्टी विजेला आकर्षित करते व थेट जमिनीत सोडते. त्यामुळे काहीही नुकसान होत नाही. अश्याप्रकारे विजेची सखोल माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यावी.

_68884151_000101553-1images (1)images
——————————————————————————————————————-
०५.) गारपीट = गारपीट म्हणजे बर्फाचे लहान , मोठे दगडासारखे तुकडे पडणे . गारपीटीचे दुष्परिणाम आपणाला माहित आहेत. शेतातील पिके , फळबागा साफ आडव्या पडतात. खूप नुकसान होते. आपण जर अश्या गारपिटीत सापडलो तर किंवा गारा पडताना बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर दगडा पेक्षाही जास्त मारा गारांचा लागतो . त्यासाठी अश्या वातावरणात घरातून बाहेर न पडणे कधीही उत्तम आहे.

imagesgarpit11vvgarpit1