Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

लोक वर्गणीतून शाळेचा विकास

आपल्यापैकी जे मुख्याध्यापक असतील किंवा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत असतील त्यांना माहित आहे की शाळेचे पैसे वापरताना तारेवरची कसरत करावी लागते. याच ठिकाणी जर काही मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी करायची असेल तर ते शक्य होत नाही.
त्यासाठी या ठिकाणी आपण शालेय व्यवस्थापन समितीची वर्गणी गोळा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मत असेल की लोक १-२ रुपये देत नाहीत मग वर्गणी कशी देणार किंवा बऱ्याच जणांनी केले असतील काही जणांचे प्रयत्न यशस्वी झालेही असतील. मित्रांनो हे शक्य आहे लोक वर्गणी देतात फक्त आपण आपले प्रयत्न सोडता कामा नये. वर्गणी जमल्यावर त्यातून आपण शाळेला रंगरंगोटी, शाळेसाठी साहित्य, संगणक, प्रोजेक्टर अश्याप्रकारचे साहित्य घेऊन शाळेचा विकास करू शकतो.