Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

कुमठे बीट 12 - आगगाडी


🙏🏻 नमस्कार 🙏🏻


कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. १२

✳ गणित आगगाड़ी :

         या उपक्रमात एका कार्ड चे रेख आखून दोन भाग करावेत. अशी एकूण ५ ते ६ कार्ड तयार करावीत. पहिल्या कार्ड च्या डाव्या भागात "स्टार्ट" असे लिहावे किंवा गणिताला सुरुवात केल्याचे चिन्ह काढावे ➡ व उजव्या बाजूला गणित लिहावे.
           🚂🚋🚃🚃🚃आगगाडी हा मुलांचा लहान पणापासुनचा आवडीचा विषय तीच आवड या ठिकाणी उपयोगात आणुन गणिताच्या क्रियांमध्ये तर्कसंगत विचार करून दिल्येल्या कार्ड मधुन एका गणिताचे उत्तर शोधल्या नंतर दुसरे गणित मिळते, पुन्हा त्याच्या उत्तराचा शोध घेतल्यानंतरही पुढील गणित ..अशा प्रकारे एक गंमत गाडी तयार होते. जोपर्यंत 😊 हे चिन्ह मिळत नाही किंवा गणित आगगाड़ी संपल्याचे चिन्ह मिळत नाही, तोपर्यंत ही गंमत गाडी सुरूच राहते.
            गणिताच्या चारही मुलभुत क्रियांसाठी ही गंमत गणित गाडी इयत्ते नुसार वापरता येते. मुले आनंदाने शिकतात एकेका क्रियेचे दृढीकरण होण्यास मदत होते. मिश्र उदा.यामध्ये घेता येतात.


 ✳ या उपक्रमामुळे पुढील उद्दीष्टे साध्य होतात :

१)मुले आनंदाने हसत खेळत  आनंदाने सांख्यिक क्रिया शिकतात.
२) लहान गटासाठी (इ.१ली व २री) बेरीज वजाबाकी या क्रियांचे दृढीकरण होते.
३)मोठ्या गटासाठी गुणाकार व भागाकार या क्रियांचे दृढीकरण होते.
४) तोंडी व पटपट उदा.सोडवण्याची सवय लागते.
५) मुले तर्कसंगत विचार करू लागतात.
६) उत्तर सापडत नसल्यास आपल्या सवंगड्याची मदत घेतात.
            मला या उपक्रमाचा असा फायदा झाला कि माझ्या इयत्ता ३री च्या वर्गातील जी मुले फळ्यावर दिलेली ४ ते ५ उदाहरणे सोडवण्याचा कंटाळा करायची तसेच खुप वेळ लावायची, ती मुले आता अगदी वेगात गणित सोडवतात. ६ डब्यांचि आगगाड़ी संपू नये असे वाटते.