Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

कुमठे बीट - 8 - कविता निर्मीती


🙏🏻 नमस्कार 🙏🏻

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. ८


✳ कविता तयार करणे :

        या उपक्रमात वर्गातील फलकाचे उभी रेख आखुन दोन भाग करावेत. एका भागात कवितेचा विषय लिहावा तर दुसऱ्या भागात त्या विषयाला यमक जुळणारे शब्द लेखन करावे. त्या यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी विद्यार्थी सरावाने तयार करतात.
    उदाहरणार्थ :
                    "झाड"
     या विषयाचे यमक जुळणारे शब्द विद्यार्थ्याना विचारावेत. जसे,
वाढ, पाड, लाड, माड, जाड इत्यादी.
     यावरून विद्यार्थी कवितेच्या ओळी तयार करतात. जसे,
        एक होते झाड
        त्याचा केला लाड
        झाडाची झाली खुप वाढ
        तो झाला माड
        झाड झाले जाड
  यापद्धतीने मुले कविता तयार करतात. यात प्रथम एक विषय घेऊन सराव घेऊ शकतो व नंतर दोन विषय घेऊन एक कविता बनवण्याचा सराव घेऊ शकतो.

✳ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
१) विद्यार्थी यमक संकल्पना समजून घेऊन अनेक अर्थपूर्ण यमक शब्द शोधतात.
२) यमक शब्द वापरून कवितेच्या ओळी तयार करतात.
३) शब्दांतील किंवा ओळींतील सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतात.
४) पुर्वज्ञानाचा वापर करत अत्यंत अलंकारिक कविता तयार करतात.
५) भाषेच्या काव्य प्रकार निर्मितीचा आनंद विद्यार्थ्याना प्राप्त होतो.

      या उपक्रमाचा मला आलेला अनुभव असा की, माझ्या मुलांनी या पद्धतीने अनेक विषयांवर कविता बनवायला सुरुवात केलीय. पाठ्यपुस्तकातील कविता देखील ते वारंवार वाचून त्यातले यमक शब्द नव्याने आनंद झाल्यासारखे वाचतात. काही इंग्रजी शब्दांचाही यमक वापर करतात. अतिशयोक्ति नाही ठरणार परंतु, तोंडी परीक्षेत मी कविता गायन हा प्रश्न ठेवला होता त्यात बरेच मुले म्हणाली...टीचर, पुस्तकातल्या कवितेपेक्षा मी तयार केलेली कविता म्हणू का....?
    धन्यवाद!!!
     गौरी पाटील
चांदोरी मुले, ता-निफाड,
    जि- नाशिक