Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

कुमठे बीट 7 - बालसभा


🙏🏻 नमस्कार 🙏🏻

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र. ७

✴ बालसभा :
           या उपक्रमात वर्गातील सर्व मुलांना एकत्र बसवून कोणत्याही एका विषयावर सभा घेण्यास सांगावे. सभेत विद्यार्थ्यानेच सूत्रसंचालन, अध्यक्ष निवड, अनुमोदन, आभार मानावे.
✏उदा.
आपण शाळेमध्ये विविध महापुरूषांच्या जयंती व पुण्यतीथी साजरी करताे .या प्रसंगी मुलांना संपुर्ण कार्यक्रमाचे नियाेजन करण्यास सांगावे शिक्षकांनी सुलभक म्हणुन काम पहावे.
✏या उपक्रमातुन पुढील उद्दीष्टे साध्य हाेतात
१) मुलांना कार्यक्रमाचे नियाेजन करण्याची माहीती हाेते
२) सभाधीट पणा वाढताे
३)मुले संबधीत विषयावर सखाेल माहीती मिळवतात.
४)आपले विचार प्रभावी पणे मांडण्याचा प्रयत्न करतात
५ )उत्कृष्ट संचलन करण्याची सवय लागते
६) सर्वांनी मिळुन टिम वर्क करण्याची सवय लागते
७) एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण हाेते .
८) बालसभेद्वारे विद्यार्थ्यांचे अनेक कार्यक्रमांबाबत असलेले मत ते व्यक्त करतात.

            या उपक्रमाचा मला आलेला अनुभव असा की, आमच्या चांदोरीला (तालुका-निफाड) दरवर्षी होत असलेल्या बोहाड़ा या कार्यक्रम संदर्भात मी मुलांना बालसभा घेण्यास लावली असता त्यात मुलांनी सूत्रसंचलन केले, अध्यक्ष निवडला व मते मांडण्यास सुरुवात केली. यात मुख्यत्वे करून त्यांनी सभेत असे ठरवले की, यंदाच्या बोहड्यात सर्व पात्रांचा लिलाव लहान मुलेच करतील आणि सर्व पात्रे देखील लहान मुलेच करतील. तसेच रोज कार्यक्रम सुरुवात रात्री ९ ऐवजी सायंकाळी ७ वाजता सुरु होईल. ही बालसभा दुरुन पाहतांना मला जाणवत होते की मुले त्या कार्यक्रमाचे गांभीर्य समजून नियोजन करत होते. आणि ख़रच वयाने मोठी असल्याचा आव आणत होते.. मला जणू मी पु. ल. देशपांडे यांचे "वयम् मोठम् खोटम्" हे नाटक पाहत असल्याचा अनुभव आला. बालसभा पाहताना आपणा सर्वानाही असा अनुभव येऊ शकतो.
      धन्यवाद!!!
       गौरी पाटील (नाशिक)