Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

कुमठे बीट 1 - न ठरवता गप्पा




🙏🏻 नमस्कार🙏🏻

कुमठे बिट वर आधारित अनेक msg सध्या whats app वर शेयर होत आहेत. खुप सुंदर अनुभव असतात ते.. परंतु आपण ते मुलांत प्राथमिक स्तरापासून रुजवायचे कसे यासंबधी  मी आपणास काही माहीती देत आहे.


 कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र.1

✳ न ठरवता गप्पा:
        या उपक्रमात मोठा गोल आखणे. गोलभोवती मुलांना बसवावे. कोणत्याही एका मुलाला गोलात बसवून त्याच्याशी अनौपचारिक गप्पा मारणे. गोलामधील मुलाला त्याचे मित्र/ मैत्रीणी काहीही प्रश्न विचारू शकतात.


✳ या उपक्रमामुळे विद्यार्थ्याबाबत पुढील बाबी स्पष्ट हाेतात :

1) मुलाने श्रवण व्यवस्थित केले का?
2) प्रश्नाचे आकलन झाले का?
3) उत्तर देण्याची क्षमता आहे का?
4) शब्द संपत्ती पुरेशी आहे का?
5) बोली भाषा वापरतोय का?
6) मुलाच्या वैयक्तिक अडचणी    समजतात.
7) मुलांचे समुहात बोलण्याचे धाडस वाढते.
8) मुलांचे नकळत मुलाखत घेण्याचे कौशल्य विकसित होते.

        या उपक्रमातुन सातारचे श्री सराटे सर यांना असे समजले की त्यांच्या वर्गातला एक मुलगा घरगुती अडचणी मुळे जेवणाचा डबा आणत नव्हता... कारण त्यांच्या घरी आर्थिक अडचण हाेती
सरांनी महिनाभर त्याच्या वडिलांचा पगार मिळे पर्यंत आपल्या घरून  त्याला डबा आणुन दिला
उपक्रमातुन शिक्षकांना  मुलांची समस्या समजण्यास मदत झाली   धन्यवाद!!!
       श्रीम गाैरी पाटील
उपशिक्षिका  शाळा चांदाेरी (मुले)
       ता.निफाड जि.नाशिक